मराठा आरक्षणाकरिता शासन जर सहकार्य करत असले, तर आमचं त्यांना सहकार्य राहिल, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
-दिलीप दखणे
वडीगोद्री : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) शासनाने चार मागण्यांपैकी दोन मागण्यांबाबत निर्णय घेतला आहे. उर्वरित दोन मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी शासनाला पंधरा दिवसांचा वेळ देत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उद्यापासून (ता.15) होणारे साखळी उपोषण सध्या स्थगित केले आहे. ते उपोषण पंधरा दिवस पुढे ढकलले आहे.