मुरुड - महाराष्ट्रात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजासमोर सध्या अनेक मोठी आव्हाने उभे आहेत अशा वेळेस तरुणांनी व्यसनापासून दूर राहून समाजाची एकी कायम ठेवून संघटित होऊन आव्हानांना सामोरे जावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी मुरुड ता लातूर येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव कमिटीतर्फे आयोजित शिवरायांच्या पुतळ्यास अभिषेक केल्यानंतर समाज बांधवांसमोर ते बोलत होते.
मुरुड येथे गेल्या आठ दिवसा पासून शिवजन्मोत्सवानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले होते. मराठा आरक्षण लढ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लढा उभा करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मुरुड येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.
सकाळी साडेनऊ वाजे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांची विधिवत पूजा जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. तदनंतर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व सकल मराठा समाज मुरुड च्या वतीने पाटील यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे ध्येय घेऊन मी लढत आहे माझा लढा मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय बंद होणार नाही.
कुणबी नोंदीच्या माध्यमातून समाजातील काही लोकांना लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे, उर्वरित समाज बांधवांचा प्रश्नही शासनाकडून लवकरात लवकर सोडवून घेतला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्ध अभिषेक घालून महाआरती करण्यात आली.
शिवगर्जना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह गावातील सर्व शिवप्रेमी ग्रामपंचायत कार्यालयाचे पदाधिकारी पोलीस स्टेशन मुरुडचे सर्व अधिकारी व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.