

Parbhani News
esakal
मानवत: मागील काही दिवसांपासून कॅशचा तुटवडा असल्याने शहरातील एटीएम बंद आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहक, शेतकरी व व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाला रोख रकमेचा पुरवठा होतो. स्टेट बँकेमार्फत शहरातील इतर बँकांना रोख रक्कम पुरवली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून स्टेट बँक ऑफ इंडियामध्येच रोख रकमेचा पुरवठा जवळपास बंद आहे. त्यामुळे शहरातील इतर बँकांनाही रोख रक्कम मिळालेली नाही.