Crime
sakal
मानवत - सोशल मीडियावरील छायाचित्राचा गैरवापर करून ते प्रसारित केल्याने मानसिक धक्का बसलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने जीवन संपविल्याची घटना मानवत शहरातील धनगर गल्ली परिसरात घडली. याप्रकरणी मुलीच्या भावाच्या फिर्यादीवरून एका तरुणाविरुद्ध मानवत पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.