Manwat Municipal Council employees submitting a memorandum to District Collector Sanjay Chavan
sakal
- सत्यशील धबडगे
मानवत - मानवत नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाचा आज ७ वा दिवस आहे. स्थानिक पातळीवर वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक तोडगा निघत नसल्याने अखेर कर्मचाऱ्यांच्या लालबावटा संघटनेच्याच्या वतीने 2 सप्टेंबर रोजी परभणीचे जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्याकडे दाद मागण्यात आली आहे.