esakal | परभणी शहरात 'आरटीपीसीआर' टेस्टमुळे अनेकांची लसीकरणाकडे पाठ
sakal

बोलून बातमी शोधा

कोविड तपासणी

परभणी शहरात 'आरटीपीसीआर' टेस्टमुळे अनेकांची लसीकरणाकडे पाठ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी ः महानगरपालिकेने शहरातील लसीकरण (Parbhani muncipal coporation center) केंद्रावर शनिवार (ता.15) पासून आरटीपीसीआर टेस्ट (Rtpcr test complasary) अनिवार्य केल्यामुळे अनेक केंद्रांवर वादाचे प्रसंग उद्भवले तर अनेकांनी टोकन न घेताच लसीकरण केंद्रातून काढता पाय घेतला. जे लसीकरणाला येताच त्यांच्यासाठीच टेस्ट अनिवार्य, परंतु ज्यांनी लसीकरणाकडे पूर्णतः पाठ फिरवली आहे, त्यांचे काय ? असा सुर संतप्त नागरीकांतून उमटत आहे. (Many turn to vaccination due to RTPCR test in Parbhani)

महानगरपालिकेने शहरातील नऊ लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी आलेल्या नागरीकांना आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य केल्या आहेत. पालिकेच्या केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून पालिकेचे टोकन करणारे व आरटीपीसीआर टेस्ट करणारे कर्मचारी हजर झाले होते. ज्यांनी टेस्ट केली, त्यांनाच टोकन देण्यात येत होते. काहींनी टेस्ट करून घेतल्या परंतु अनेक नागरीकांनी या टेस्टला विरोध केला. ज्यांची इच्छा असेल ते टेस्ट करतील परंतु ज्यांची नाही त्यांना टोकन दिलेच पाहिजे, असा सुर संतप्त नागरीकांतून उमटला. नागरीकांच्या रेट्यापुढे अनेक केंद्रावर टोकन देण्यात आले, परंतु आपण जेव्हा लसीकरणासाठी येताल, तेव्हा आरटीपीसीआर करावीच लागेल, अशा सूचना पालिका कर्मचारी देत होते.

हेही वाचा - जाणून घ्या, ऑक्सिजनबाबत तुमच्या मनातील प्रश्नांचे उत्तर

जायकवाडीत 68 जणांच्या टेस्ट

जायकवाडी परिसरातील पालिकेच्या आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रावर शनिवारी सकाळी 200 टोकन वाटप करण्यात आले. त्यापैकी फक्त 68 जणांनी आरटीपीसीआर टेस्ट करुन घेतली. टोकन घेऊन गेलेल्यांपैकी अनेक जण परत येण्याची शक्यता कमी आहे. प्रत्येक केंद्रावर अशीच परिस्थिती होती.

शहरातच आरटीपीसीआर टेस्ट का ?

फक्त शहरातच आरटीपीसीआर टेस्ट का ? प्रशासनाचे टेस्टचे उद्दीष्ट पूर्ण होत नाही का ? ज्या- ज्या भागासाठी पालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, तेथील नागरीकांनी कोरोना टेस्ट व लसीकरण करुन घेतले का ? ग्रामीण भागातही कोरोना वाढतोय, तेथे टेस्ट अनिवार्य का नाही ? त्याच त्याच नागरीकांच्या टेस्ट का ? अजुनही अनेक घटकात टेस्ट व लसीकरणासाठी जनजागृतीची गरज आहे, प्रशासन त्याकडे का दुर्लक्ष करते. असे अनेक प्रश्न नागरीक उपस्थित करीत होते.

येथे क्लिक करा - जिंतूर परिसरात तळपत्या उन्हात पाण्यासाठी वन्यजीवांची भटकंती

अनेकांची खेड्याकडे धाव

शहरातील लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी, आरटीपीसआर टेस्ट अनिवार्य असले प्रकार होत असल्यामुळे शहरातील अनेक नागरीकांनी लसीकरणासाठी आजुबाजूच्या खेडोपाड्यातील लसीकरण केंद्रांकडे धाव घेतली आहे. ग्रामीण भागातील अनेक केंद्रांवर देखील उद्दीष्टपुर्ती होत नसल्यामुळे त्यासाठी या नागरीकांचे तेथे स्वागतच होत असल्याची माहिती, सुत्रांनी दिली.

पालिका प्रशासनाने आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य केल्यामुळे लसीकरणालाच ब्रेक लागण्याची शक्यता आहे. अगोदरच लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण संथ गतीने सुरु आहे. प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा. या प्रकरणी आपण जिल्हा प्रशासनासह पालिका प्रशासनाला देखील टेस्ट बंद करण्याची विनंती केली आहे.

-श्रीमती उषाताई झांबड, नगरसेविका, मनपा, परभणी.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top