
पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाने मराठा समाजाला हादरून सोडलं. या दु:खद घटनेनंतर समाजाने एकत्र येत विवाह सोहळ्यांसाठी आचारसंहिता जाहीर केली. याच आचारसंहितेचं पालन करत जालन्यातील परतुर येथे पहिला साधा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याने समाजात नव्या परंपरेची पायाभरणी केली आहे. ना हुंडा, ना डीजे, फक्त 200 पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह साजरा झाला, जो सामाजिक बदलाचा एक उत्तम नमुना ठरला आहे.