देगलूर - मराठा आरक्षण प्रकरणी संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनास यश येताच बुधवारी ता. ३ रोजी गावा-गावात जल्लोष साजरा केला. एक आठवड्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यास गेलेले देगलूरातील प्रत्येक गाव खेड्यातील मराठा समाज बांधव बुधवारी ता. ३ रोजी गावाच्या वेशीवर येताच मोठ्या उत्साहात त्यांचे ढोल, ताशाच्या गजरात स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत समाजबांधवांचे औक्षण ही केले.