Maratha Kranti Morcha : शिरूर अनंतपाळ तालुक्यात रस्ता रोको

सुधाकर सूर्यवंशी
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

शिरूर अनंतपाळ (जि.लातूर) : शिरुर अनंतपाळसह तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यावर मराठा समाजाकडून आरक्षण मागणीसाठी चक्काजाम रस्ता रोको अंदोलन करीत शहरासून अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त केला.

शिरूर अनंतपाळ (जि.लातूर) : शिरुर अनंतपाळसह तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यावर मराठा समाजाकडून आरक्षण मागणीसाठी चक्काजाम रस्ता रोको अंदोलन करीत शहरासून अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त केला.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात आरी मोड, येरोळ मोड, उजेड, साकोळ अशा विविध ठिकाणी सकल मराठा बांधवाकडून सकाळपासूनच रस्त्यावर उतरून रस्ता रोको करण्यात आला. या अंदोलनात मात्र रुग्णांची गैरसोय होऊ दिली नाही. आंदोलकांनी रुग्णवाहिकांना सन्मानाने रस्ता मोकळा करुन दिला. जागोजागी टायर जाळून प्रचंड घोषणाबाजी करून रस्ता रोको करण्यात आला. आरी मोड व येरोळ मोड येथे वाहतुक व्यवस्था ठप्प होती. तर शिरूर अनंतपाळ येथे मराठा समाजाकडून प्रेत यात्रा काढून सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. या आज झालेल्या अंदोलनात लहानापासून ते वयोवृध्दापर्यंत सर्वजन सामील झालेले दिसून आले. 

Web Title: Maratha Kranti Morcha : road block for maratha agitation