Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी गोदाकाठच्या १२३ गावांची बैठक घेऊन २९ ऑगस्ट रोजी मुंबई मोर्चासाठी समाजाने सज्ज राहावे, असे आवाहन केले.
अंकूशनगर : आम्ही कोणाच्या बापाचं आरक्षण घेत नाही आमचं हक्काच आरक्षण आहे ,गप्प बसू नका गाफिल राहू नका. आरक्षण अमृत आहे हे सोडू नका असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले.