Maratha Reservation : अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ॲड. चव्हाण व परळी विधानसभा अध्यक्ष देशमुख यांचा राजीनामा

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, यासाठी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ॲड. चव्हाण व परळी विधानसभा अध्यक्ष देशमुख यांनी दिला राजीनामा.
Agitation for maratha reservation
Agitation for maratha reservationsakal

घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) - मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या अमरण उपोषणाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण व पक्षाचे परळी विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख या दोघांनी आपल्या पदाचे राजीनामे देत येथे सुरु असलेल्य साखळी उपोषणात सहभाग घेतला.

ॲड. चव्हाण व श्री. देशमुख यांनी राजीनाम्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना पाठविले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून सर्कलनिहाय साखळी उपोषणे सुरु आहेत. यात विविध गावांतील समाज बांधव सहभाग घेत आहेत.

मात्र, मागील दोन दिवसांपासून आंदोलनादरम्यान हिंसक घटनाही घडत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आग, दगडफेक, आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक व वाहनांची जाळपोळ असे प्रकार घडलले आहेत.

याच दरम्यान पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश्वर चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या समवेत परळी विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख यांनीहीही राजीनामा दिला. या दोघांनी घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथे सुरु असलेल्या साखळी उपोषणात सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com