Maratha Reservation : भोकरदन शहरात कडकडीत बंद; ठीक ठिकाणी चक्काजाम आंदोलन

भोकरदन शहरात सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन
maratha reservation bhokardan city closed curfew protest school holiday marathi news
maratha reservation bhokardan city closed curfew protest school holiday marathi newsSakal

भोकरदन : भोकरदन शहरात सलग दुसऱ्या दिवशी (ता.३१) मंगळवारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे सर्व रस्ते ठप्प झाले असून, शहरातील बाजारपेठेत कडकडीत बंद आहे. शिवाय काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरंगे पाटील यांची तब्येत सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे खालावत असल्याने संतप्त झालेल्या काही मराठा आंदोलकांकडून भोकरदन शहरात तसेच तालुक्यातील अनेक भागात विविध आंदोलने करण्यात येत आहे.

काल (ता.३०) सोमवारी देखील भोकरदन शहरात ठीक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. आरक्षणाचा तिढा सुटला नसल्याने याचा परिणाम सलग दुसऱ्या दिवशीही भोकरदन शहरत पाहायला मिळत आहे.

संतप्त आंदोलकांकडून शहरातील सिल्लोड कडे जाणाऱ्या महात्मा फुले चौक, नवीन भोकरदन, जाफराबाद कडे मुख्य जाणाऱ्या रस्त्यावर टायरे जाळून, तसेच पाईप व इतर साहित्य रस्त्यावर आडवे लावून सकाळपासूनच चक्काजाम आंदोलन करण्याचे आहे. सकापासूनच शहरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद आहे.

यावेळी आंदोलकांकडून "एक मराठा लाख मराठा" अशा जोरदार घोषणा देण्यात येत असून, राज्य सरकार व लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. चक्काजाम आंदोलनामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, या आंदोलनामुळे शहरातील काही शाळांनी सुट्टी देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com