esakal | Maratha Reservation: आरक्षणासाठी ‘छावा’ घेणार आक्रमक भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

maratha reservation

Maratha Reservation: आरक्षणासाठी ‘छावा’ घेणार आक्रमक भूमिका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद: अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. १२) येथे ‘मराठा आरक्षण पुढील दिशा’ यावर आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये श्री. जावळे यांनी मराठा आरक्षणासाठी नऊ ऑगस्टपासून आक्रमक भूमिका घेण्याचे ठरले. यावेळी महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून अमृता अजिंक्य गायकवाड तर छावा जिल्हा वकील सल्लागार म्हणून पृथ्वीराज कोकाटे यांची निवड करण्यात आली.

यावेळी विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू कोळी, छावा प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष गणेश जाधव, जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हाकार्याध्यक्ष राजेंद्र साळुंके, युवक जिल्हा अध्यक्ष कालिदास गायकवाड, तुळजापूर अध्यक्ष दिनेश रोचकरी, धाराशिव शहर अध्यक्ष दादासाहेब कोरके आदी उपस्थित होते.

loading image