
गेवराई : आज सायंकाळी पाच वाजता ज्वारी,बाजरीच्या भाकरी,चटणी, ठेचा अन् लोणचं मारोतीच्या मंदिरासमोर जमा करा हो--! दंवडीचे स्वर कानी पडताच गेवराईच्या ग्रामीण भागातील गावखेड्यातील पेटतात चुली,भाकरी तयार झाल्यावर जमा करून रोज रात्री मिळेल त्या वाहनातून जेवण (मायेची शिदोरी)मुंबईला युवक पोहोच करत आहे.यात प्रामुख्याने महिला अन् युवक पुढाकार घेत आहेत.