Maratha Reservation : दुसऱ्या टप्प्यातील मराठा आरक्षण आणखी तीव्र होणार; उद्यापासून बेमुदत साखळी उपोषण

मराठा आरक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन दिवसेंदिवस शांतपणे सुरू असले तरी ते तीव्र स्वरूपाचे होत चालले आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationEsakal

करमाड (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) - मराठा आरक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन दिवसेंदिवस शांतपणे सुरू असले तरी ते तीव्र स्वरूपाचे होत चालले आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्याच्या वतीने करमाड या मध्यवर्ती ठिकाणी रविवारी (ता. 29) चक्का जाम आंदोलन तर 30 तारखेपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने समाज बांधवांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून तर तालुक्यातील बहुतांश गावात सर्व पक्षाच्या नेत्यांना 'नो एन्ट्री' चे बॅनर झलकत असून अनेक ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण सुरू झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, यामुळे मात्र सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गोची निर्माण झाली आहे. मराठा समाज बांधवांच्या वतीने पक्ष कार्यकर्त्यांना पदाचे राजीनामे देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

करमाड सर्कल मध्ये शनिवारपासून या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही चित्र आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात विशेष सभेचे आयोजन करण्यात येउन यात गावात कुठल्याच नेत्याला प्रवेश देण्यात येऊ नये, प्रवेश दिला गेल्यास व यदाकदाचित काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास समाज बांधील राहणार नसून, त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा ग्रामपंचायतीचा ठराव पास करण्यात येउन असा आशयाचा फलक गावच्या प्रथम दर्शनी भागात लावण्यात येत आहे. त्यानंतर या फलकाच्या उभारणीसाठी पोलीस ठाण्यातुन रीतसर परवानगी घेण्यात येत आहे. याकामी दररोजच कुठल्यांकुठल्या गावचे समाज बांधव ठाण्यात ठाण मांडून बसलेले दिसतात.

आज चक्का जाम आंदोलन; उद्यापासून बेमुदत साखळी उपोषण

गावागावातील साखळी उपोषणानंतरही शासन स्तरावरील कासवगतीच्या हालचाली बघता हा लढा आणखी तीव्र करण्याचा समाज बांधवांचा मनसुबा दिसतो. कारण, या अनुषंगाने रविवारी (ता. 29) करमाड या तालुक्याच्या मध्यवर्ती भागातील जालना महामार्गालगतच्या शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर सकाळी दहा ते बारा या वेळात चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.

यासाठी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी गावा गावात कोपरा बैठका घेउन नियोजन केले आहे. त्यानंतर सोमवारपासून (ता. 30) बेमुदत साखळी उपोषण सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या साखळी उपोषणात सर्कल मधील जयपुर, दुधड, सय्यदपुर, सटाणा, जडगाव, बनगाव, गाढेजळगाव, मंगरुळ, कुबेर गेवराई, शेवगा, उचलती, वडखा, गोलटगाव, टोणगाव, वरझडी, औरंगपुर, काऱ्होळ, गारखेडा,पिंपळखुटा, शेलुद, शेकटा, हिवरा, भांबर्डा, चारठा, पिंप्रीराजा, लाडसांवगी, हातमाळी, सटाई, मुरुमखेडा, लाडगाव, आडगाव खु., बनगाव, कुंभेफळ, दिलालपुर, शेंद्रा, डायगव्हाण, वरुड काजी, टाकळी माळी, गंगापुर जहागिर आदी गावचे समाज बांधव सहभागी होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com