

Maratha Reservation Updates
esakal
Maratha Reservatioin
वडिगोद्रीः मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसू नये, यासाठी अंतरवाली सराटीत सरकारच्या शिष्टमंडळाने भेट दिली. मात्र या चर्चेत कोणताही तोडगा निघाल नाही. समीती रात्री मुख्यमंत्री फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बसून चर्चा करणार आहे. जर प्रलंबित मागण्यांची अमंलबजावणी सरकार करणार असेल, तसे लेखी आश्वासन, आदेश सरकारकडून आले तर सकाळी उपोषणाबाबत निर्णय घेतला जाईल, सध्या मी उपोषण बाबत ठाम आहे.. असे मनोज जरांगे यांनी सांगितले.