Maratha Reservation : उमरग्यात मराठा समाजाची वज्रमुठ !

४३ गावात आजी, माजी मंत्री, आमदार खासदारांना प्रवेश बंद ; गुंजोटीत लहान मुलासह महिलांचा उपोषणात सक्रिय सहभाग
umarga
umargasakal

उमरगा - मराठा समाजाने आरक्षण मागणीसाठी सुरु केलेल्या उपोषणाला शहर व तालुक्यातुन वाढता पाठींबा मिळत आहे. उमरगा शहरात साखळी उपोषणाच्या पाचव्या दिवशीही रविवारी (ता. २९) पाठींब्यासाठी मराठा बांधवांची वज्रमुठ दिसून आली.

मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील सहा गावांतील साखळी उपोषणाला उदंड प्रतिसाद मिळत असून उमरगा येथे आण्णासाहेब पवार यांनी रविवारपासुन अमरण उपोषणाला सुरवात केले आहे. 

रविवारी माडज, गुगळगाव, कोरेगाव व वागदरी येथील मराठा बांधवानी शहरातून रॅलीद्वारे घोषणा देत सारीका पाटील, रोहिणी माने, छाया जाधव, बलभीम काळे, शहाजी गायकवाड, चंद्रकांत काळे, विजय तळभोगे, गोविंद पाटील, गजानन तळभोगे, पंकज जगताप, संभाजी पाटील, मारुती जाधव, प्रथमेश पांगे, परमेश्वर जाधव, ओमप्रकाश इंगळे यांनी उपोषणात सहभाग घेतला. या वेळी स्मिता गायकवाड या चिमूकलीने जोशपूर्ण भापणाने उपस्थितांत चैतन्य निर्माण केले. दरम्यान धनगर समाज, लहुजी शक्ती सेना, समस्त वडार समाज, महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान, शिवशक्ती युवा प्रतिष्ठानने उपोषणाला पाठिंबा दिला.  गुंजोटी, कोराळ, कदेर, मुरुम, तुगाव व तलमोड या सहा गावातील उपोषणाला भरघोस पाठिंबा मिळत आहे. 

umarga
Maratha Reservation : खासदार संजय राऊत यांच्या विरोधात 'चले जाव, चले जाव ' सह तीव्र शब्दात घोषणाबाजी

गुंजोटीत लहानग्यांचा उपोषणात सहभाग

गुंजोटीत सुरु असलेल्या उपोषणात सार्थक चौगुले, सोनाक्षी शिंदे, आर्यन पाटील, विक्रांत साळुंके, अथर्व गायकवाड, आर्यन शिंदे, प्रसाद सूर्यवंशी, साईराज जाधव, गणेश शिंदे, कृष्णा शिंदे, समृद्धी पाटील, योगिता पाटील, अरुणा गायकवाड, वर्षाताई गायकवाड, अश्विनी चौगुले, छबुबाई पाटील, उषा पाटील, मंजुषा चव्हाण, रेणुका शिंदे, मीनाक्षी भोसले, संजीवन गायकवाड, संतोष जाधव, ओमराजे पाटील, विशाल घारगे सहभाग होता.

umarga
Maratha Reservation : अंतरवाली सराटी येथे 5 व्या दिवशी उपोषण सुरुच; जरांगे यांची तब्येत खालावली, वैघकिय उपचाराला नकार

कोराळ येथे महिलांचे आमरण उपोषण

मराठा आरक्षणाची आणि शेतकऱ्यांच्या आक्रोशाची जाणीव सरकारला व्हावी म्हणून कोराळ येथील सकल मराठा समाजाच्या महिलांनी शनिवारपासुन (ता.२८) सुरू केलेल्या अमरण उपोषणात संगीता‌ सुरवसे, निर्मला भगत, राजश्री भगत, अनिता सुरवसे, कल्पना सुरवसे, प्रमिला सुरवसे, शकुंतला सुरवसे, कमल शिंदे, अंजीर भगत, वनिता जाधव, राजाबाई सुरवसे, रूपा सुरवसे, जयश्री सुरवसे, विमल जाधव, सुनिता पवार, प्रमिला जाधव, स्वाती जाधव, बारकुल भगत  सहभागी झाल्या आहेत.

तुगांव ग्रामस्थांचे साखळी उपोषण

तुगांव येथे आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार (ता.२९) पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू झाले आहे

मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देत पहिल्या दिवशी विकास हराळकर, दिलीप जोमदे, संभाजी पवार, श्रीधर माने, बंडू फंड यांचा साखळी उपोषणात सहभाग होता. या वेळी दीपक जोमदे,  विष्णुपंत माने, हरी माने, धनंजय माने, पाटील, प्रशांत माने, अजित माने, गणेश माने, प्रदीप गायकवाड, पवन शिंदे, विपुल कोराळे, प्रा. रोहन हराळकर, संतोष कुरूम आदींची उपस्थिती होती.

४३ गावात मंत्री, लोकप्रतिनिधींना प्रवेश बंद

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ४३ गावात आजी, माजी मंत्री, आमदार खासदारांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे एरव्ही मतदारसंघात विविध कामांच्या निमित्ताने वास्तव्यास येणारे आमदार ज्ञानराज चौगुले सध्या दिसत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com