Maratha Reservation : मराठा-मुस्लीम एकतेचे दर्शन; आंदोलकांसाठी आडूळ गावातून पाठवले खाद्यपदार्थ

Maratha Muslim Unit : आडूळ गावातील मराठा व मुस्लीम समाज बांधवांनी मुंबईतील आंदोलकांसाठी भाजी-भाकरी, पाणी, चिवडा यांसारखे साहित्य पाठवून एकतेचं आणि माणुसकीचं अनोखं उदाहरण घालून दिलं.
Maratha Reservation
Maratha Reservation Sakal
Updated on

आडूळ : मुंबई येथील मराठा आंदोलकांसाठी पैठण तालुक्यातील आडूळ बु येथून सोमवारी ( ता. १ ) रोजी रात्री ११ वाजता खाद्यपदार्थ पाठविण्यात आले.रविवारी रात्री येथील मारुती मंदिरात मराठा समाज व मुस्लीम बांधवांची संयुक्तिकरित्या बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीत लोकसहभागातून वर्गणी जमा करून आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेल्या मराठा समाज बांधवांची कोणतीही खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांना गावातून भाजी भाकरी,ठेचा,पाणी,बॉटल,चिवडा,लोणचे आदी साहित्य पाठविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com