Maratha Kranti Morcha marches to the Tehsil office
sakal
फुलंब्री - मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय असलेले फुलंब्री तालुक्याचे भूमिपुत्र किशोर बलांडे यांच्या समर्थनार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बलांडे यांच्याबाबत सोशल मीडिया व विविध माध्यमांतून करण्यात आलेल्या वक्तव्यांची चौकशी करून अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालय असा एक किलोमीटर पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते.