

Dharur News Manoj Jarange Patil Consoles Parents of Siddharth Gaikwad Who Died by Suicide Amid Maratha Reservation Demand
esakal
किल्लेधारूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या धारूर येथील सिद्धार्थ फुलचंद गायकवाड (वय १८) याच्या कुटुंबीयांची मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी (ता. २७) भेट घेतली. यावेळी त्यांनी सिद्धार्थच्या आई-वडिलांचे सांत्वन करून कुटुंबीयांशी संवाद साधला. अवघ्या १८ वर्षांच्या सिद्धार्थच्या मृत्यूने धारूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी गायकवाड कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.