esakal | Osmnabad : नदी, नाल्यांकाठची शेती गिळली पुराने!
sakal

बोलून बातमी शोधा

Osmnabad : नदी, नाल्यांकाठची शेती गिळली पुराने!

Osmnabad : नदी, नाल्यांकाठची शेती गिळली पुराने!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने दोन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नदी, नाले, ओढ्याचे प्रवाह बदलणे, उभे पिके वाहून जाणे, असे प्रकार घडल्याने नदी, ओढ्या काठची शेती नाहीशी झाली आहे.

जिल्ह्यात सोमवारी (ता. २७) आणि मंगळवारी (ता. २८) पहाटे मुसळधार पावसाने हाहाकार माजविला. जिल्ह्याच्या इतिहासात अनेक वर्षांनंतर प्रथमच मोठा पाऊस झाल्याचे नागरिकांनी अनुभवले. प्रमुख नद्या मांजरा आणि तेरणा नद्यांना महापूर आल्याने अनेक ठिकाणी शेती आणि शिवारात पाणी साचले होते. उस्मानाबाद तसेच कळंब तालुक्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. शिवाय तेरणा, मांजरा या दोन्ही नद्या कळंब तालुक्यातून वाहत असल्याने नदीकाठची शेती मोठ्या प्रमाणात नाहीशी झाली.

जिल्ह्यात मंगळवारपर्यंत सुमारे ३७ जनावरे दगावली होती. याशिवाय बुधवारी अनेकांची जनावरे वाहून गेल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या संख्येत वाढ होत आहे. तसेच जिल्ह्यातील सुमारे १८० घरांची पडझड झाली आहे. यामध्येही वाढ होत आहे. इर्ला (ता. उस्मानाबाद) येथील बालाजी वसंत कांबळे (वय ३०) हे नदीत पडून वाहून गेले असून, त्यांचा शोध प्रशासन घेत आहे.

दोन ठिकाणी मनुष्यहानी झाली आहे. दोन्ही तालुक्यात मिळून पावणेदोन लाख ते दोन लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनाम्याचे सुरू आहे.

- कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी,

loading image
go to top