औरंगाबादमध्ये कचर्‍याच्या प्रश्नावरून राडा!

मनोज साखरे
गुरुवार, 1 मार्च 2018

औरंगाबाद : कचरा टाकण्यावरून मिटमिटा, हनुमान टेकडी भागात नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर गुरुवारी (ता, 1) दुपारी कांचनवाडी परिसरात मोठा राडा झाला. कचरा घेऊन येणारी वाहने फोडून दगडफेक करण्यात आली. यात एसटी बसचेही नुकसान झाले, पोलिस आल्यानंतर परिस्थिती निवळली. 

कचरा टाकण्यावरून शहरात गेल्या पंधरा दिवसापासून मोठे रणकंदन माजले आहे. आरोग्याचा प्रश्न पुढे करून नारेगावनंतर शहरातील विविध भागात कचरा टाकण्यास महापालिकेच्या कचरा गाड्यांना मज्जाव करण्यात येत आहे.

सकाळच्या सत्रात हनुमान टेकडी परिसर आणि मिटमिटा येथे मोठा विरोध होऊन कचऱ्याची गाडी पेटवून गाड्यांना पिटाळले होते. त्यानंतर दुपारी कचरा वाहतूक करणारी वाहने कांचंवाडीत येताच नागरिक संतप्त झाले. त्यांनी या वाहनांना विरोध करून हल्लाबोल केला, त्यानंतर दगडफेक सुरु केली. कचऱ्याच्या गाड्या फोडण्यात आल्या.

जमाव उग्र झाल्यानंतर त्यांनी रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना लक्ष्य केले यात बसवरही दगडफेक झाली.

कांचनवाडीत मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाल्यानंतर मात्र परिस्थिती काही अंशी निवळली. सुमारे 50 महिला आणि 25 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, कचऱ्याची वाहने कांचंनवाडीत एका जागी रिकामी होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भारत काकडे यांनी दिली.

Web Title: marathi news aurangabad news Aurangabad Municipal Corporation