शिवसेनेसोबत मांडू पुढील अर्थसंकल्प: मुनगंटीवार

राजेभाऊ मोगल 
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यात जिथे जातील तिथे भाजपवर निशाणा साधन टिकेची झोड उठवत आहेत. त्यांच्या सुरात सुर मिळवत त्यांचे अन्य नेतेही स्थानिक पातळीवरही भाजपच्या नेत्यांवर कडाकडून टिका करीत आहेत. कुठल्याही क्षणी शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, असे वारंवार सांगितले आहे. याशिवाय आगामी निवडणुकांत स्वबळाचा नाराही श्री. ठाकरे यांनी दिला आहे. असे असताना मुनगंटीवार यांनी युतीचे संकेत दिले. 

औरंगाबाद : राज्यातील सत्तेत वाटेकरी असूनही भाजपच्या देशभरातील मंत्र्यांसह नेत्यांवर टिकेची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने आगामी निवडणुकांत स्वबळाचा नारा दिला असला तरी आगामी काळातही शिवसेना आपल्या सोबतच राहील, अशी भाजपला अजूनही आशा आहे. तसे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (ता. 5) येथे दिले. राज्याचा 2020 चा अर्थसंकल्पही भाजप- शिवसेना सोबतच मांडेल, असे सांगत त्यांनी आगामी निवडणुकीत युती होईल, असे स्पष्ट सुतोवाच त्यांनी केले. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यात जिथे जातील तिथे भाजपवर निशाणा साधन टिकेची झोड उठवत आहेत. त्यांच्या सुरात सुर मिळवत त्यांचे अन्य नेतेही स्थानिक पातळीवरही भाजपच्या नेत्यांवर कडाकडून टिका करीत आहेत. कुठल्याही क्षणी शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, असे वारंवार सांगितले आहे. याशिवाय आगामी निवडणुकांत स्वबळाचा नाराही श्री. ठाकरे यांनी दिला आहे. असे असताना मुनगंटीवार यांनी युतीचे संकेत दिले. 

राज्याचा येऊ घातलेला अर्थसंकल्प या सरकारचा शेवटचा असेल का, असा पत्रकारांनी प्रश्‍न केला असता ते म्हणाले, ""ऑक्‍टोंबर 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक आहेत. त्यामुळे 2019 मधीलच नव्हे तर 2020 मधील अर्थसंकल्प देखील भाजप- शिवसेना सोबत सादर करेल.'' त्यांच्या या वक्‍तव्यांनी तेथील भाजपच्या मंत्री, पदाधिकाऱ्यांनाही बुचकळ्यात टाकले. 

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांच्या नियोजन बैठकी मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. चार जिल्ह्यांचा आढावा घेतल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री बबनराव लोणीकर, भाजपचे पदाधिकारी बसवराज मंगरुळे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news Aurangabad news Sudhir Mungantiwar statement on Shiv Sena