विद्यार्थिनीला अश्लील मॅसेज करणाऱ्या शिक्षकाला फासले काळे

योगेश पायघन
सोमवार, 12 मार्च 2018

शिक्षक मनोज जैस्वाल याने विद्यार्थीनीला अश्लील मॅसेज करत त्रास दिला. 

औरंगाबाद - सरस्वती भुवन महाविद्यालयात बारावीत वाणिज्य शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थिनीला शिक्षक मनोज जैस्वाल अश्लील मॅसेज करत होता. तसेच ब्लॅकमेल करत अश्लील व्हिडीओ चॅटिंग करत होता. हा प्रकार विद्यार्थिनींच्या भावाच्या लक्षात आल्यावर त्यांनी महाविद्यालयात जाऊन शिक्षकाला सोमवारी (ता. 12) सकाळी दहा वाजेच्या सुमारास काळे फासले. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: marathi news aurangabad student teacher vulgar words