
छत्रपती संभाजीनगर : रासायनिक खतांचा वारेमाप वापर वाढलाय, तीच ती पिके वर्षानुवर्षे घेतली जाताहेत. त्यामुळे कृषी शास्त्रज्ञांनो, काळी आई आता आजारी पडलीय, तिला नीट करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढे या, अशी आर्त साद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी मंगळवारी (ता. १७) घातली.