

Marathwada News
esakal
छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना कृषी व्यावसायासोबतच उत्पन्नाचा अधिकचा स्रोत म्हणून कृषी पर्यटन संस्कृती उपयुक्त ठरत आहे. राज्य पर्यटन संचालनालयाकडे मराठवाड्यातील १५० शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन केंद्र सुरू केल्याची नोंद केली आहे. विविध पर्यटन मार्गांवर सुरू असलेल्या या कृषी पर्यटन केंद्रांची राज्य पर्यटन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडून नियमित वेळोवेळी पाहणी केली जाते. त्यातून पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांचा आढावा घेतला जातो. आतापर्यंत मार्चअखेर छत्रपती संभाजीनगर विभागातील नोंदणी केलेल्या ११६ केंद्रांची पाहणी केली. त्यातील ९५ केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्र दिले.