esakal | मराठवाड्यात कोरोनाचा कहर! मागील 24 तासांत कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ

बोलून बातमी शोधा

marathwada corona updates}

मागील दहा दिवसांपासून मराठवाड्यात कोरोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे

मराठवाड्यात कोरोनाचा कहर! मागील 24 तासांत कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: मागील दहा दिवसांपासून मराठवाड्यात कोरोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे. औंरगाबादसह इतर जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण शेकडोंनी वाढत आहेत. मराठवाड्यात रविवारी (ता.7) जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाच्या 1 हजार 189 रुग्णांचं निदान झालं. त्यामध्ये औरंगाबादमध्ये 426, जालन्यात 219,  लातूर 69, नांदेड 229, हिंगोली 55, परभणी 20, उस्मानाबाद 49 तर बीड जिल्ह्यात 122 नवीन रुग्ण आढळले आहेत. 

वाढत्या रुग्णवाढीमुळे औरंगाबादमध्ये 11 मार्चपासून अंशतः लॉकडाऊन लावलं आहे. मागील 24 तासांत औरंगाबादमध्ये कोरोनाचे 426 रुग्ण आढळले आहेत. तर 164 जणांनी (मनपा 109, ग्रामीण 55)  कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 48 हजार 459 वर गेली आहे. तर नवीन रुग्णांच्या संख्येमुळ जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 हजार 969 वर गेली आहे.

Women's day 2021: संघर्षातून बनल्या गटविकास अधिकारी, माजलगावच्या प्रज्ञा...

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाने आजपर्यंत एकूण 1 हजार 292 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 3 हजार 218 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (348) घाटी परिसर (3), जवाहर कॉलनी (1), पुंडलिक नगर (2), इटखेडा (5), दशमेश नगर (2), वेदांत नगर (5), स्टेशन रोड परिसर (6), एमआयटी कॉलेज परिसर (1), एसआरपीएफ कॅम्प परिसर (1), बीड बायपास (10), छत्रपती नगर (1), महादेव मंदिर परिसर, व्हीनस सो. (1), सातारा परिसर (3), उस्मानपुरा (5), शिवशंकर कॉलनी (1), सिग्मा हॉस्पीटल परिसर (2), नागेश्वरवाडी (1), गारखेडा (6), तारा पान सेंटर परिसर (1), गुलमंडी (4), भावसिंगपुरा (4), श्रीनिकेतन कॉलनी (3), अंगुरीबाग (1), विद्या नगर (1), खोकडपुरा (1), शहानूरवाडी (5), बेगमपुरा (2), राम नगर (1), ठाकरे नगर (2), एन दोन (4), शहानूरमियाँ दर्गाह परिसर (1),

माया नगर (3), फोनेक्स परिसर (1), कामगार चौक (3), जय भवानी नगर (2), गुरू सहानी नगर (1), विद्या नगर (1), हर्सुल परिसर (3), रामा इंटरनॅशनल हॉटेल परिसर (1), पडेगाव (3), देवप्रिया हॉटेल परिसर (3), मिडो हॉटेल परिसर (1), सिडको (1), एन सात (8), एसपी ऑफिस परिसर (1), जाधववाडी (5), एन बारा (1), एशियन फार्मसी (1), हडको (2), एकनाथ नगर (1), पिसादेवी रोड (2), एन नऊ (9), चंद्रनगर सो. (1), साफल्य नगर (1), एन अकरा (1), ताज हॉटेल परिसर (1), जय नगर (2), हनुमान नगर (2), गजानन कॉलनी (2), आविष्कार कॉलनी (1), शिवाजी नगर (4), पारिजात नगर (3), आकाशवाणी परिसर (2), सिंधी कॉलनी (2), सूतगिरणी चौक परिसर (3), खाराकुँवा (2), प्रोफेसर कॉलनी (1), आदर्श कॉलनी (1), गणेश नगर (1), उल्कानगरी (2), आदिनाथ नगर (2), टिळक नगर (3), बन्सीलाल नगर (2), जय गजानन नगर (3), काल्डा कॉर्नर (1), खिवंसरा पार्क (1), कोकणवाडी (2), राजेश नगर (1), जालन नगर (1), भवानी नगर (2), उत्तरानगरी (2), नक्षत्रवाडी (1), वैभव कॉलनी (1), जानकीपुरी कॉलनी (1), बालाजी टॉवर, बीड बायपास (2), एमआयटी कॉलेज परिसर (1), छावणी पटेल चौक (1), मयूर पार्क (2), पैठण गेट (1),

Maratha reservation: सर्वोच्च न्यायालयात आजपासून मराठा आरक्षणावर सुनावणी

एन पाच (3), बायजीपुरा (3), मदर तेरेसा नर्सिंग कॉलेज परिसर (1), एन सहा (1), चिकलठाणा (1), स्वप्न नगरी (1), दिवाणदेवडी (2), एन आठ (6), टीव्ही सेंटर पोलिस कॉलनी (3), विशाल नगर (3), रोकडिया हनुमान कॉलनी (1), क्रांती चौक (2), सोनार गल्ली (1), श्रेय नगर (1), न्यू बालाजी नगर (1), मिटमिटा (2), कांचनवाडी (1), पैठण रोड (2), मनिषा कॉलनी (1), फैजलपुरा (1), देशमुख नगर (1), देवळाई परिसर, म्हाडा कॉलनी (3), बजाज नगर (1), पद्मपुरा (1), एन वन (3), गादिया विहार (3), रामप्रभू कॉलनी (2), संजय नगर (1), वृंदावन कॉलनी (1), नंदनवन कॉलनी (2), पटवर्धन हॉस्पीटल (1), कैलास हॉटेल (1), गुरूकृपा सो. चाणक्यपुरी (1), सेव्हन हिल्स परिसर (1), छावणी, मिलिट्री हॉस्पीटल (1), कॅनॉट परिसर (1), पैठण रोड (1), रामेश्वर नगर (1), खडकेश्वर (1), समर्थ नगर (6), शिवशंकर कॉलनी (3), न्यू नंदनवन कॉलनी (1) अन्य (73) ग्रामीण (78) वाळूज (2), वडगाव को. (5), बजाज नगर (7), सिडको महानगर एक (2), म्हाडा कॉलनी, तिसगाव (3), रांजणगाव (1), पळसगाव (1), दौलताबाद (1), चित्तेगाव (1), अन्य (55)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू-
घाटीत माया नगरातील 66 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयांत एन सहा सिडकोतील 36 वर्षीय पुरूष, केळीबाजारातील 82 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.