.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
छत्रपती संभाजीनगर: पावसाने मोठी दडी दिल्यामुळे मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे संकट असून, खरिपाची पिके करपली आहेत. दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाच ऑक्टोबरनंतरचे पंचनामे आवश्यक असले तरी त्यापूर्वीच राज्य शासनाने सर्वेक्षणाची तयारी केली आहे. एनडीआरएफच्यापूर्वीच (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन) राज्य शासन शेतकऱ्यांना मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १७) दिली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी असून, चारा, पाणी टंचाईवर मात केली जाईल, असे फडणवीस म्हणाले.