

Dhananjay Munde seeks special cabinet meeting over Marathwada drought
परळी वैजनाथ : बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आणि शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे येत्या १७ सप्टेंबर रोजी किंवा तत्सम कालावधीत लवकरात लवकर मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करून दुष्काळजन्य परिस्थितीवर उपाययोजना व शेतकर्यांना मदत करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.