

Artificial Rain Experiment Sought in Marathwada as Poor Rainfall Puts Crops at Risk Dhiraj Deshmukh Urges Maharashtra
esakal
-सुशांत सांगवे
लातूर : पावसाळ्याचे तीन महिने संपले आहेत. पण, अद्याप मराठवाड्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाला नाही. पिकांनी माना टाकल्या आहेत. चिंतातुर शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या परिस्थितीची अत्यंत संवेदनशीलतेने दखल घेऊन मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग तातडीने राबवा, अशी मागणी माजी आमदार धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी केली.