मराठवाड्याला लागणार बंपर मंत्रिपदाची लॉटरी!

शिवसैनिकांत नाराजी, तर भाजप व शिंदे गटात चैतन्य
Chief minister uddhav thackeray resign
Chief minister uddhav thackeray resign

औरंगाबाद : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेचे नाट्य आज रात्री मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्याने संपुष्टात आले. मराठवाड्यातही दिवसभर क्षणाक्षणाला वळणे घेणार्या राजकीय नाट्याची चर्चा शिगेला पोहोचली होती. रात्री मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसैनिकांत नाराजी, तर भाजपच्या व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांच्या समर्थकांत उत्साहाचे वातावरण पसरले होते. आता नव्या सरकारची व मंत्रिपदांची उत्सुकता लागली आहे. मराठवाड्यात भाजपचे १२ आमदार विधानसभेत तर दोन विधान परिषदेत आहेत. सत्तेत सहभागी होऊ शकणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटात आठ आमदार अशा तब्बल बावीस आमदारांचे पाठबळ नव्या फडणवीस सरकारमागे राहणार असल्याने अनेकांना मंत्रिपदासाठी लॉटरी लागू शकते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला मराठवाड्यात शिवसेनेच्या बारापैकी तब्बल आठ शिवसेना आमदारांनी साथ दिली. त्यात मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यासकट संजय सिरसाट, प्रदीप जैस्वाल, प्रा. रमेश बोरनारे या औरंगाबाद जिल्ह्यातील तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्ञानराज चौगुले व तानाजी सावंत या आमदारांचा समावेश होता. आता भाजप व शिंदे गटाचे सरकार सत्तेवर येऊ घातल्याने मंत्रीपदाच्या स्पर्धेत भाजपच्या इच्छुकांसोबत या बंडखोर गटातील आमदारांनाही सामावून घेण्याची कसरत फडणवीस यांना करावी लागणार आहे.

भाजपकडून फुलंब्रीचे आ. हरिभाऊ बागडे, औरंगाबाद पूर्वचे आ.अतुल सावे, निलंग्याचे संभाजी पाटील निलंगेकर, गंगापूरचे प्रशांत बंब, औशाचे अभिमन्यू पवार, सुरेश धस, रमेश कराड यांची वर्णी लागू शकते. यातही बागडे यांच्या वयोमानाचा विचार केला तर त्यांचा वेगळा विचार होऊ शकतो. श्री. सावे हे फडणवीस यांचे विश्वासू असल्याने त्यांचे मंत्रिपद निश्चित मानले जाते. लातूर जिल्ह्यात निलंग्याचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर दावा करू शकतात. तिथे फडणवीसांना त्यांचे मित्र अभिमन्यू पवार यांचाही विचार करावा लागेल.

बंडखोरांच्या गटातून आ.संदीपान भुमरे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संजय सिरसाट यांची नक्की वर्णी लागू शकते. सिरसट यांनी उध्दव ठाकरे यांच्याभोवती बडवे गोळा झाल्याचा सनसनाटी आरोप गुवाहाटीतून पत्र लिहून केला होता. त्या पत्राची चर्चा सगळीकडे झाली होती. शिवसेनेला औरंगाबाद शहरात रोखायचे असेल तर प्रदीप जैस्वाल यांच्यापेक्षा आक्रमक चेहरा लागेल. तो सिरसट यांच्या रूपाने बंडखोर गट व भाजप अजमावून पाहण्याची शक्यता आहे.

तसेच सिरसट हे खास एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील असल्याने त्यांचा समावेश नक्की मानला जातो. भुमरे व सत्तार यांच्याबाबत चर्चा असली तरी त्यांनी ठाकरे सरकारमध्ये केलेली कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्याबाबत विचार केला जाईल. मात्र या दोघांचे उपद्रव मूल्य लक्षात घेता त्यांना सत्तेच्या सारीपाटात कुठेतरी सामावून घ्यावे लागेल.

पंकजा मुंडेंचे काय होणार?

मागच्या फडणवीस सरकारमधील मंत्री व भाजपच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांचे काय होणार हा एक कळीचा व महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे. त्यांनाही आजही मासबेस नेता म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या कांही दिवसापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षात त्या कुठेही दिसल्या नाहीत. एकतर त्यांची रवानगी पक्षाने पक्षसंघटनेत राष्ट्रीय सचिव पदावर केली आहे. त्यांच्याकडे मध्यप्रदेशची जबाबदारी दिली आहे. मागील दोन विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या इच्छुकांच्या यादीत त्यांचे नाव प्राधान्याने घेण्यात आले. मात्र त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. मधल्या काळात त्यांचे समर्थक असलेल्या डॉ. भागवत कराड यांना पक्षाने थेट केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्यानंतर पंकजांचे पंख पक्षातून कापले जात असल्याची चर्चा सुरू झाली. ती नंतर विधान परिषदांत नाव डावल्यानंतर अधिक अधोरेखित झाली. या सार्यामागे देवेंद्र फडणवीस असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळते का ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com