

लातूर धाराशिव : अतिवृष्टीने किंवा नैसर्गिक आपत्तीने शेती पिकांचे नुकसान झाले तर दोन-दोन वर्षे शासनाकडून भरपाईची रक्कम मिळत नाही, याचा अनुभव शेतकऱ्यांना वारंवार येतो. आता मात्र राज्यात स्पष्ट बहुमताने सत्तेवर येताच महायुती सरकारने राज्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीतील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी भरपाईसाठी निधी मंजूर केला आहे.