rain
rainsakal

हिंगोली जिल्ह्यात चोवीस तासात ६५.३० मिलीमीटर पाऊस

तालुक्यातील वारंगा मंडळात सर्वाधिक १३८.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. आजपर्यंत १३०.३० टक्के पाऊस झाला आहे.
Published on

हिंगोली : जिल्ह्यात मंगळवार ता. २८ भल्यापहाटे पासून स़ंततधार पाऊस सुरू असुन आज सकाळी आठ वाजेपर्यंत ६५.३० मिलीमीटर पाऊस झाला असुन वीस मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर कळमनुरी तालुक्यातील वारंगा मंडळात सर्वाधिक १३८.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. आजपर्यंत १३०.३० टक्के पाऊस झाला आहे.

rain
रत्नागिरी : अत्याधुनिक जलशुद्धीकरणामुळे मिळणार शुद्ध पाणी

जिल्ह्यातील मागील चोवीस तासात ६५.३० मिलीमीटर पाऊस झाला. तालुका निहाय झालेला पाऊस हिंगोली तालुका ७९.३० मिलीमीटर, कळमनुरी ७८.८०, वसमत ७६.१०, औंढा ५६.२०, सेनगाव २८.९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकुण ६५ ३० तर आजपर्यंत १३० ३० टक्के पाऊस झाला आहे. मंंडल निहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे जिल्ह्यात विस मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

rain
कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीला रवाना, भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता

हिंगोली मंडळात ८६ मिलीमीटर, नर्सी ५५.५ मिलीमीटर, बासंबा ७६.८ मिलीमीटर, डिग्रस ७८.५ मिलीमीटर, माळहिवरा ८४.४ मिलीमीटर, खांबाळा ६९.५ तर एकुण ७९ ३ मिलीमीटर पाऊस झाला. कळमनुरी म़डळात ४४ ३ मिलीमीटर, वाकोडी ५०, नांदापुर ६५, बाळापुर ९३ ३, डोंगरकडा ८१ ३, वारंगा १३८.८ एकुण ७८.८ मिलीमीटर पाऊस झाला.वसमत मंडळात ९२ ३ मिलीमीटर, आंबा ६७.८, हयातनगर ९५ ३, गिरगाव ६९, हट्टा ६६.५, टेंभुर्णी ९०, कुरुंदा ५१.८ एकुण ७६ १मिलीमीटर पाऊस झाला. औढा मंडळात ५२. ५ मिलीमीटर येहळेगाव ७०.८, साळणा ४४, जवळा ५७.५, एकुण ५६.२ मिलीमीटर पाऊस झाला. सेनगाव मंडळात १८.३ मिलीमीटर, गोरेगाव ३८.५, आजेगाव ३१, साखरा १६.८, पानकनेरगाव २७ ३, हत्ता ४१ ५ एकुण २८.९ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com