Marathwada Mukti Sangram Din : मराठवाड्याला देशातील अग्रेसर प्रदेश बनविणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मागास भाग ही मराठवाड्याची ओळख पुसून आता सर्वांगीण विकासाचे पर्व सुरू झाले आहे.
Marathwada Mukti Sangram Din : मराठवाड्याला देशातील अग्रेसर प्रदेश बनविणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर - ‘मागास भाग ही मराठवाड्याची ओळख पुसून आता सर्वांगीण विकासाचे पर्व सुरू झाले आहे. मराठवाड्याला देशातील अग्रेसर प्रदेश बनविण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (ता. १७) दिली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्तंभाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुक्तिसंग्राम लढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पोलिसांच्या तुकडीद्वारे शोकसंदेश देऊन हवेत तीन फैरी झाडण्यात आल्या.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ध्वजवंदन करून मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छापर संदेश दिला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘मुक्तिसंग्रामात अनेकांनी योगदान दिले. त्याची प्रेरणा कायम राखण्यासाठी विभागातील प्रत्येक जिल्ह्यात स्मृतिस्तंभ उभारण्यासाठी दोन कोटी रुपये दिले आहेत. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या पर्वाची सुरुवात झाल्याचे ते म्हणाले. मराठवाड्यावरील ‘मागास भाग’ हा शिक्का पुसण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेतले आहेत,’ असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालयातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लाला लक्ष्मीनारायण, मोहनलाल जैस्वाल यांच्या तैलचित्राचे अनावरण तसेच मराठवाडा मुक्तिसंग्राम चित्रप्रदर्शनाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

‘खैरात वाटपातून दिवस साजरा होत नाही’

‘मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत राज्य सरकारने मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेत घोषणांचा पाऊस पाडला. मात्र, मराठवाड्यात येऊन आश्वासनांची खैरात वाटणे म्हणजे हा दिवस साजरा केला असे मानून चालणार नाही, अशी टीका करतानाच मराठवाड्याला पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे,’ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा देतानाच ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना सुनावले आहे. पुरेशा पाण्यासाठी मराठवाड्याचा गेली कित्येक दशके झगडा सुरू आहे. त्यातच यावर्षीही मराठवाड्यात चांगला पाऊस झाला नसल्यामुळे पुढच्या काही महिन्यांत पाण्यासाठीची वणवण बघायला मिळणार असल्याचेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com