राहत्या घरी नव दाम्पत्याचे मृतदेह आढळल्यानं खळबळ; मृत्यूचं गूढ कायम | Suicide | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death

राहत्या घरी नव दाम्पत्याचे मृतदेह आढळल्यानं खळबळ; मृत्यूचं गूढ कायम

पूर्णा : नवविवाहित दांपत्याचे मृतदेह (Death Bodies) त्यांच्या घरात आढळून आल्याची घटना कात्नेश्वर (ता.पूर्णा) येथे उघडकीस आली. मृतदेहा शेजारी विषारी औषध पिवून रिकामी केलेली एक लिटरची बॉटल आढळून आली असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलीसात करण्यात आली आहे. (Marathwada Newly Married Couple Death)

कातनेश्वर येथील गंगाधर विश्वनाथ चापके (वय २५ ) याचा केवळ आठ महिन्यापूर्वी पिंपळगाव कुटे येथील सपना या युवतीशी विवाह संपन्न झाला होता. शनिवारी (ता.८ ) रात्री त्या दोघांनी आपल्या राहत्या घरी जेवण केले व आपल्या खोलीमध्ये झोपले होते. मयत गंगाधरचे आई वडील बाहेरगावी गेलेले होते. मध्यरात्री त्यांनी दोघांनी विषारी औषध प्राशन केले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: हडपसरमध्ये दीड कोटींचा गुटखा पोलीसांकडून जप्त

दरम्यान रविवारी (ता.९ ) सकाळी सपना व गंगाधर झोपेतून उठत नसल्यामुळे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला असता दोघीही मृत अवस्थेमध्ये घटनास्थळी आढळून आले त्या ठिकाणी विषारी औषधाची एक लिटरची बॉटल आढळून आली. पोलीस निरीक्षक सुभाष मारकड , सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, अर्जुन रणखांब, विष्णू भोसले, श्री. कांबळे आदी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व पूर्णा येथील ग्रामीण रुग्णायात शवविच्छेदन करण्यात आले . दुपारी या दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेतील आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणामध्ये पुढे चौकशी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाष मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश मुळे हे करीत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Marathwada
loading image
go to top