गेवराई: गोदापात्रात शेतकरी गेला वाहून

जगदीश बेदरे
रविवार, 20 ऑगस्ट 2017

शोध सुरू : पवार 
तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरी पाञात एक शेतकरी वाहून  गेल्याची माहिती असुन  सध्या  ग्रामस्थांच्या मदतीने वाहून गेलेल्या व्यकतीचा शोध कार्य सुरू असल्याचे तहसीलदार संजय पवार यांनी सांगितले.

गेवराई : शनिवारी झालेल्या पावसाने नदीपात्रातील विद्युत मोटार काढण्यासाठी गेलेला एक शेतकरी गोदावरीत आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथे रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.

या शेतकऱ्याचा गोदावरी पाञात ग्रामस्थ शोध घेत आहेत. दरम्यान दोन जण आपला जीव वाजविण्यास यशस्वी ठरले. गेवराई तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथील शेतकरी बकंट लक्ष्मण जाधव (वय 55) व बाबासाहेब कडू धारकर (वय 45), गोकुळ मसु कोळेकर हे शनिवारी झालेल्या पावसाने गोदावरी नदीत असलेली विद्युत मोटार बाहेर काढण्यासाठी रविवारी सकाळी गेले असता नदीपात्रात आलेल्या पुरात तिघे जण वाहुन गेले होते.

त्यापैकी बाबासाहेब व गोकुळ  हे पोहून परत आले माञ बकंट हे पाण्यात वाहून  गेले. त्यांना शोधण्यासाठी ग्रामस्थांनी सकाळपासून गोदावरीत पाञात शोध मोहीम घेतली होती.

शोध सुरू : पवार 
तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरी पाञात एक शेतकरी वाहून  गेल्याची माहिती असुन  सध्या  ग्रामस्थांच्या मदतीने वाहून गेलेल्या व्यकतीचा शोध कार्य सुरू असल्याचे तहसीलदार संजय पवार यांनी सांगितले.

Web Title: marathwada news farmer drown in gevrai