Corona : मराठवाड्यात ३८२ जण कोरोनाबाधित, १२ रुग्णांचा मृत्यू

Corona
Corona

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाची (Corona In Marathwada) दुसरी लाट ओसरली असून शनिवारी (ता.३१) दिवसभरात ३८२ रुग्ण आढळले तर १२ जणांचा मृत्यू झाला. नांदेड (Nanded), लातूर (Latur), परभणी (Parbhani), जालना (Jalna) आणि हिंगोली (Hingoli) जिल्ह्यांत मृत्यूची नोंद झाली नाही. बीड व उस्मानाबाद वगळता इतर सहा जिल्ह्यांत ८४ रुग्ण आढळले. (marathwada covid cases 382 recorded glp88)

बीड, उस्मानाबादेत रुग्णसंख्या वाढतीच

बीड (Beed) जिल्ह्यात १९८ जणांच्या कोरोना (Corona) चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या पाठोपाठ उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातही दिवसभरात शंभर रुग्णांची भर पडली. दोन मृत्यूची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात ३५ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यात शहरातील ११ तर ग्रामीण भागातील २४ रुग्ण आहेत. पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Corona
...म्हणून गणपतराव देशमुख संसदीय लोकशाहीतील पितामह : हर्षवर्धन पाटील

नांदेड जिल्ह्यात पाच रुग्ण

नांदेड जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित आढळले. दिवसभरात चार जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ४७ रुग्ण उपचार घेत असून, यातील तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९० हजार १७९ एवढी झाली आहे. यातील ८७ हजार ४७७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५५ एवढी आहे.

परभणीत केवळ एक बाधित

परभणी जिल्ह्यात एका रुग्णाची नोंद झाली. दिवसभरात चार रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या ३२ जण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५१ हजार १७६ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ४९ हजार ८५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार २८६ जणांचा मृत्यू झाला.

हिंगोलीत दोन रुग्ण बरे

हिंगोली जिल्ह्यात नव्याने तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. दिवसभरात दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण १५ हजार ९९८ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १५ हजार ५९२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ३८८ जणांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला एकूण १८ रुग्णांवर उपचार चालू आहेत. त्यापैकी चार रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जालना, लातूरमध्ये मृत्यू नाही

जालना जिल्ह्यात १२ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. मृत्यूची नोंद झाली नाही. सात रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ६१ हजार ४५६ कोरोनाबाधितांपैकी ६० हजार १८९ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झालेत. आतापर्यंत कोरोनामुळे एक हजार १७९ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात सध्या ८८ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लातूर जिल्ह्यात दिवसभरामध्ये कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही. दरम्यान, २८ नवे रुग्ण आढळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com