esakal | Marathwada Rain Updates : मराठवाड्यात २७ सप्टेंबरपर्यंत पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस

Marathwada Rain Updates : मराठवाड्यात २७ सप्टेंबरपर्यंत पाऊस

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात आगामी चार दिवसात विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून वर्तविण्यात आली असल्याची माहिती परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (Vasantrao Naik Marathwada Agriculture University) ग्रामीण कृषी मौसम विभागाच्या वतीने गुरुवारी (ता.२३) देण्यात आली आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात गेल्या आठवड्यापासून कधी जोरदार तर कधी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. या मुळे संपूर्ण मराठवाड्यात (Rain In Marathwada) सध्या पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. परभणी जिल्ह्यात येलदरी व निम्न दुधना प्रकल्प १०० टक्के भरल्याने त्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणामी येलदरी धरणाचे पाणी पूर्णा नदीत व निम्न दुधनाचे पाणी गोदावरी नदीत येत असल्याने पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा: नांदेडमध्ये मालगाडी रुळावरुन घसरली, मनमाड-हैदराबाद रेल्वेमार्ग बंद

त्यातच सतत पाऊस सुरु असल्याने या पाण्यात अधिकच वाढ होतांना दिसत आहे. आगामी चार दिवसात परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार ता.२४ सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. ता.२५ सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. ता. २६ सप्टेंबर रोजी जालना, परभणी, नांदेड, लातूर व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. ता. २७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी दिली आहे.

loading image
go to top