Marathwada : मराठा आरक्षणासाठी रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र...

जरांगे हे विना अन्न पाण्याचे उपोषणाला बसले असून तुमचं सरकार दखल घेत
letter
lettersakal

सेनगाव - तालुक्यातील गोरेगाव येथील तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. जरांगे पाटलांचं काही बरं वाईट झालं तर विचार करा तुम्हाला आमच्या दारात सुध्दा उभं करणार नाही. असा इशारा देखील या पत्रातून राज्य सरकारला इशारा दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस असून राज्यातील मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सेनगाव तालुक्यातुन जरांगेना समर्थन देण्यासाठी गावा-गावात शांततेच्या मार्गाने विविध प्रकारची आंदोलने केली जात आहेत. साखळी उपोषण, आमरण उपोषण, कँडल मार्च आदीसह इतर आंदोलने सुरू असतानाच तालुक्यातील गोरेगाव येथून एका मराठा तरुणाने आपल्या रक्ताने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसह मनोज हरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे.

letter
Maratha Reservation : उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळे फासू

जरांगे हे विना अन्न पाण्याचे उपोषणाला बसले असून तुमचं सरकार दखल घेत नाही. जर जरांगे पाटलांना काही बरं वाईट झालं तर विचार करा या तालुक्यात तुम्हाला आम्ही आमच्या दारात सुध्दा उभं करणार नाही. असा इशारा या पत्रातून मुख्यमंत्री व राज्य सरकारला देण्यात आला आहे. आमच्या रक्ताचा थेंब आणि थेंब हा जरांगे पाटलांसाठी आहे. आम्ही तुम्हाले रक्ताने पत्र लिहिलो. दखल घ्या, आम्हाले आरक्षण द्या. आमच्या जरांगे पाटलांची तब्येत खराब होत आहे. असाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर हे पत्र चांगलंच होत व्हायरल होत असल्याचे पहायला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com