Marathwada Sahitya Sammelan : मराठवाडा साहित्य संमेलन शनिवारपासून

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्‍घाटन, दोन दिवस भरगच्च कार्यक्रम
Marathwada Sahitya Sammelan
Marathwada Sahitya Sammelansakal

जालना : घनसावंगी (जि. जालना) येथे १० व ११ डिसेंबरला ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन होत असून जोरात तयारी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष शिवाजी चोथे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, माजी आमदार संतोष साबरे आदी उपस्थित होते. चोथे म्हणाले, घनसावंगी येथील संत रामदास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उभारण्यात येणाऱ्या महदंबा साहित्य नगरीत संमेलन होईल. ३०० ते ४०० साहित्यिक, कवी सहभागी होणार आहेत. दहा डिसेंबरला सकाळी साडेआठला मावळते संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन होईल.

संमेलनाध्यक्ष शेषराव मोहिते, मावळते संमेलनाध्यक्ष बिरादार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, जिल्हाधिकारी विजय राठोड, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार संजय जाधव, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार बबनराव लोणीकर, राजेश टोपे, कैलास गोरंट्याल, संतोष दानवे, नारायण कुचे, राजेश राठोड, सतीश चव्हाण, विक्रम काळे, घनसावंगीचे नगराध्यक्ष पांडुरंग कथले, कैलास महाराज हेमके आदी उपस्थिती असतील.

उद्‍घाटन सत्रानंतर दुपारी कथाकथन होईल. ''लेखकांचे लेखन समाजमाध्यमांच्या आवर्तात अकडलेले आहे’, ‘मी का लिहितो’, ‘कृषी जीवनातील प्रक्षोभ आणि मराठी लेखक’, ‘संत साहित्याची उपेक्षा समाज चारित्र्यासाठी हानिकारक आहे’ आदी विषयांवर परिसंवाद होतील. सायंकाळी ‘आमचे कवी, आमची कविता’ हा कार्यक्रम होईल तर रात्री कविसंमेलन होईल.

रविवारचे कार्यक्रम

संमेलनात रविवारी (ता.११) होणारे कार्यक्रम असे ः सकाळी ज्येष्ठ लेखिका रेखा बैजल यांची पृथ्वीराज तौर, ऋषीकेश देशमुख, डॉ. यशवंत सोनुने मुलाखत घेतील. त्यानंतर बाल मेळावा होईल. बाल-कुमार लेखकांशी गप्पा, कविसंमेलन, ‘वर्तमान स्थितीत प्रसारमाध्यमांकडून अपेक्षा’ या विषयावर परिसंवाद, बाल-कुमार कथाकथन होईल. ‘मराठवाड्यातील राजकीय चित्र ः दशा आणि दिशा’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण अध्यक्षस्थानी असतील. अंबादास दानवे, पंकजा मुंडे, राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर, लक्ष्मीकांत देशमुख आदी सहभागी होतील. त्यानंतर बाल-कुमार कविसंमेलन व समारोप सोहळा होणार होईल. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रल्हाद लुलेकर आदींसह राजकीय नेते, पदाधिकारी उपस्थित असतील.

पुस्तकांसह अवजारांचे स्टॉल

संमेलनास्थळी २५ ग्रंथ विक्री स्टॉल असतील. शेतकऱ्यांसाठी सहा शेती अवजारांचे स्टॉल असतील, अशी माहिती स्वागताध्यक्ष चोथे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com