
परभणी : मराठवाड्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. मॉन्सूनपूर्व पावसाचे हे सत्र अजून चार ते पाच दिवस कायम राहण्याची शक्यता आहे, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले. तर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे.