
भूम ता. १ ( बातमीदार ) भूम तालुक्यातील चार सोयाबीन केंद्रावर बारदाना अभावी दहा दिवसापासून सोयाबीन खरेदी रखडली .तर भूम येथील खरेदी केंद्रावर शेतकरी स्वतःच्या खर्चातून बारदाना आणून खरेदी केंद्राला सोयाबीन देत आहेत .महाराष्ट्र राज्य सहकारी पणन सेवा संघ मुंबई व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यात आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत .यामध्ये भूम तालुक्यात सोयाबीन खरेदी चालू असून चारही खरेदी केंद्रावर आतापर्यंत ४३५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ११४५ शेतकऱ्यांची आतापर्यंत सोयाबीन खरेदी झाली असून १९६० शेतकऱ्यांना मेसेज सोडण्यात आले आहेत तर ३२०५ शेतकऱ्यांचे अद्यापही सोयाबीन खरेदी झालेली नाही .
आत्ताच मंत्र्यांनी सोयाबीन खरेदीसाठी पाच दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे परंतु आजार भूत खरेदी केंद्रावर बारदाणा अभावी सोयाबीन खरेदी संथ गतीने चालू आहे .आतापर्यंत भूम तालुक्यातून २१९०९ क्विंटल सोयाबीनचे खरेदी झाली असून भूम खरेदी केंद्रावर ६४८४क्विंटल, ईट खरेदी केंद्रावर ७२००क्विंटल, सोन्नेवाडी खरेदी केंद्रावर ५६००क्विंटल तर पाथरूड खरेदी केंद्रावर २६२५ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे .