

Marathwada News
esakal
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात १६ ते १९ मार्चदरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे रब्बी पिकांसह फळबागांचे ११ हजार ५७२ हेक्टरवर नुकसान झाले. यात २० हजार ८९६ शेतकरी बाधित झाले. सर्वाधिक, आठ हजार ४५५ हेक्टरवर नुकसान एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे. या जिल्ह्यातील ३८७ गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून १५ हजार ३०२ शेतकरी बाधित झाले आहेत.