
छत्रपती संभाजीनगर - गेल्या शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातील अनेक भागांना झोडपून काढले आहे. नदी-नाल्यांना पूर आला असून शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ठिकठिकाणी मालमत्ता, पशूधन, शेतीचे नुकसान झाले आहे. विदर्भातील पूरस्थिती बिकट झाली असून अनेक महामार्ग पाण्याखाली गेले आहेत.