marathwada
marathwadasakal

Marathwada : मुक्तीसाठी विश्वनाथ राजहंस यांनी पत्करले हौतात्म्य

जरंडी आणि घोसला गावात मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी स्वातंत्र सैनिकांचे गुप्त कार्यालय होते.

सोयगाव - भारताच्या स्वातंत्र्य नंतरही मराठवाडा निजामाच्या ताब्यात होता. निजामाच्या तावडीतून मराठवाडामुक्ती सोयगाव तालुक्यात कै विश्वनाथ कालिदास राजहंस यांनी हौतात्म्य पत्करले. त्यामुळे त्यांची इतिहासाची साक्ष म्हणून जरंडी येथे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.

येथील हुतात्मा स्मारकामध्ये स्वातंत्र्य दिनी (ता.१५) ऑगस्ट, तसेच एक मे, प्रजासत्ताक दिन आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ध्वजारोहण करण्यात येते. जरंडी येथील हुतात्मा विश्वनाथ राजहंस यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर निजामाशी १९४७ नंतरही मराठवाडा मुक्ती करण्यासाठी संघर्ष केला.

जरंडी आणि घोसला गावात मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी स्वातंत्र सैनिकांचे गुप्त कार्यालय होते. या दोन्ही ठिकाणावरून निजामाशी संघर्ष करण्याची रणनीती आखण्यात येत होती .

दरम्यान, जरंडी येथील हुतात्मा विश्वनाथ राजहंस यांनी निजामाच्या लढ्यात छातीवर गोळ्या झेलून मराठवाडा मुक्तीसाठी बलिदान दिले.

त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री ए आर अंतुले सरकारने सोयगाव तालुक्यात स्मारक उभारण्याचा निर्णय घेऊन जरंडी गावात स्मारक उभारण्यात आले. तेव्हापासून या स्मारकात ध्वजारोहण करण्यात येते

marathwada
Marathwada Mukti Sangram Din : काय आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा इतिहास? वाचा सविस्तर

जरंडी ग्रामपंचायतीचा पुढाकार

जरंडी ग्रामपंचायतीने आता या हुतात्मा स्मारकाचा ताबा घेतला असून या स्मारकाच्या भव्य प्रांगणात दहा हजार वृक्षांची लागवड झाली आहे. स्मारकाच्या देखभाल दुरुस्ती करण्यात येते. स्मारकात व्यायाम शाळा उभारणी करण्यात आली आहे. हुतात्मा विश्वनाथ राजहंस यांचे नातू विशाल राजहंस यांच्या हस्ते या स्मारक परिसरात ध्वजारोहण होते.

marathwada
PM Modi: 'D येणार आणि C जाणार..', 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान मोदींचा फॉर्मूला काय आहे? जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com