

Water tankers supply drinking water to drought-affected villages across Marathwada.
esakal
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू लागल्याने टॅंकरची संख्या आता ५६० वर गेली आहे. १८ दिवसांपूर्वी म्हणजेच २१ ऑक्टोबरला ही संख्या ४७३ वर होती. याशिवाय सध्या मराठवाड्यातील तब्बल ९१७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तालय प्रशासनातर्फे गुरुवारी (ता. सहा) देण्यात आली.