Marathwada Water Crisis: सरकारच्या दुर्लक्षाने मराठवाड्याचे ७ टीएमसी पाणी अडकले! दोन बोगद्यांची कामे ठप्प, पंपगृहही अपूर्ण; शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याला ब्रेक

7 TMC Water for Marathwada Stuck as Irrigation Project Work Halts: सरकारच्या दुर्लक्षाचा फटका मराठवाड्याला; ७ टीएमसी पाण्यासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा कधी संपणार?
Maharashtra Irrigation Project Delayed 7 TMC Water for Marathwada Stuck as Tunnel Construction and Pump House Work Halted

Maharashtra Irrigation Project Delayed 7 TMC Water for Marathwada Stuck as Tunnel Construction and Pump House Work Halted

esakal

Updated on: 

कळंब : मराठवाड्याच्या दुष्काळी भागाला दिलासा देणारे कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे काम सरकारी अनास्था आणि आर्थिक नियोजनाच्या अभावामुळे रखडले आहे.कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे ७ टीएमसी पाणी आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागदावर पुढे जात असला,तरी प्रत्यक्षात दोन महत्त्वाचे बोगदे बंद आणि पंपगृहाचे काम अपूर्ण असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. परिणामी धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाण्याची प्रतीक्षा संपण्याचे नाव घेत नाही.पाण्याचा हक्क मंजूर,प्रकल्पाला निधी नाही आणि शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा प्रतीक्षाच!अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे वास्तव आमदार कैलास पाटील यांनी या योजनेला भेट देऊन समोर आणले आहे.

Loading content, please wait...