

Jayakwadi Dam water storage and pending water diversion decisions raise concerns over Marathwada’s drinking water and irrigation needs.
esakal
परभणी:मराठवाड्यातील पाणीप्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठ्यावरच संपूर्ण विभागाची भिस्त असल्याने चिंता वाढली आहे. जायकवाडीतील जलसाठा ७८ टक्के असल्याचे सांगितले जात असले, तरी आगामी काळातील पिण्याचे पाणी, शेती, औद्योगिक गरजा लक्षात घेता दीर्घकालीन नियोजनाची आवश्यकता आहे. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी इतर खोऱ्यांतून वळविण्याबाबत घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीने केली आहे.