Water Tanker : मराठवाडा झाला ‘टॅंकरवाडा’; सात जिल्ह्यांत १ हजार ४२४ टॅंकरने पाणी

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने मराठवाड्याला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या. तब्बल १,४२४ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहेत.
Water Tanker
Water Tankersakal

छत्रपती संभाजीनगर - उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने मराठवाड्याला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या. तब्बल १,४२४ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहेत. हिंगोली जिल्हा वगळता इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक संख्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात ५६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहेत. परभणी जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे पाच टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

२०२० ते २०२२ या तीन वर्षांत मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याने पाणीपातळी चांगलीच वाढली होती. मात्र, गेल्या वर्षी मॉन्सूनचे उशिरा आगमन झाल्याने पेरण्या लांबल्या. मॉन्सूनमध्ये वारंवार खंड पडल्याने त्याचा परिणाम खरीप पिकांच्या वाढीवर झाला.

सरासरीच्या ८५ टक्के पाऊस झाल्याने उत्पन्न घटले. १५ टक्के पावसाची घट झाल्याने मराठवाड्यातील पाणीसाठाही कमी झाला. त्यामुळे भर पावसाळ्यातही छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील काही गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. ९ जानेवारी २०२४ ला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०९ तर जालना जिल्ह्यात ७६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता.

२१ फेब्रुवारी रोजी ही संख्या ३१९ वर पोचली. मार्च महिन्यात टँकरची संख्या ४३५ वर पोचली. एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून उन्हाची तीव्रता वाढली. त्यामुळे पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने घट होऊ लागली. त्यामुळे टॅंकरची संख्या दिवसेंदिवस वाढली. २९ एप्रिलपर्यंत ही संख्या १,४२४ वर पोचली आहे.

२,०८३ विहिरींचे अधिग्रहण

पाण्याचे टॅंकर भरण्यासाठी व विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सध्या विभागातील २,०८३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले.

यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३०४, जालना ४१३, परभणी ३८, हिंगोली ४९, बीड ३२२, नांदेड ५७, लातूर २७२ तर धाराशिव जिल्ह्यात ६२८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. टँकरसाठी ७२७, टँकर व्यतिरिक्त १३५६ अशा २०८३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय टँकर

छत्रपती संभाजीनगर - ५६९

जालना - ४१८

परभणी - ५

नांदेड - १५

बीड - ३०२

लातूर - १३

धाराशिव - १०२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com