

Jalna News
esakal
जालना: आर्थिक वर्षाच्या अखेरीस मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध विभागांकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येत आहे. अवघ्या सत्तावीस दिवसांत तब्बल २७९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या खर्चाशी संबंधित तब्बल २,९८८ बिले कोषागार कार्यालयात सादर करण्यात आली आहेत. दरम्यान, रविवारी (ता. २९) सुटीच्या दिवशीही सर्वच शासकीय कार्यालयात अधिकारी -कर्मचाऱ्यांची मार्च एंडची धावपळ दिसून आली.